अपघाताची अस्वस्थ करणारी दृश्ये : मृतांची संख्या आठवर (व्हिडीओ)

erandol accident

एरंडोल, प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज (दि.२३) दुपारी झालेल्या ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी जीपच्या भीषण टक्करीत जीप चालकासह आठ जण ठार झाले आहेत.

 

या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आ अपघाताची मन हेलावणारी काही दृश्ये ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या हाती लागली असून त्यातून अपघाताची अंगावर येणारी भीषणता त्यातून समोर आली आहे.

अम्बुलन्सचा दरवाजा लॉक :- दरम्यान या अपघातातील गंभीर जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता, आणणाऱ्या अम्बुलन्सचा दरवाजा रुग्णालयाजवळ आल्यावर लॉक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे लोकांनी हा दरवाजा तोडून तीन गंभीर जखमींना उपचारार्थ दाखल केले आहे. पण या सगळ्या प्रकारात अक्षम्य असा तीन तासांचा उशीर झाला.

 

https://www.youtube.com/watch?v=I_3nbg7AbOw

 

Protected Content