वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रदर्शन गरजेचे – आमदार चव्हाण

mangesh chavhan

चाळीसगाव प्रतिनिधी ।  आताची जीवनपद्धती, राहणीमान, शिक्षणपद्धती खूप बदलली आहे. तंत्रज्ञान व डिजिटल एज्युकेशनचा वापर वाढल्याने शिक्षण घेणे अधिक सोपे झाले असले तरी आव्हाने मात्र त्यापेक्षा जास्त वाढली आहेत. प्रत्येक क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जर नवीन पिढी त्यात अज्ञानी राहिली तर भारताचे भविष्य अंधारात जाईल. म्हणून आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी नवनवीन संकल्पनांवर आधारित विज्ञान प्रदर्शन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते बहाळ येथे माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रयोगांची पाहणी मान्यवरांनी केली व नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली. तसेच पुढे त्यांनी सांगितले की, विविध किस्से, अनुभव व उदाहरणे सांगत मनमोकळा संवाद साधला.

2012 मध्ये माझे शिक्षक माळी सर यांच्या नावाने कॉम्प्युटर लॅब माझ्या हिंगोणे गावात सुरू केली होती. मागील वर्षभरात आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने चाळीसगाव तालुक्यातील 10 हुन अधिक शाळांना मिनी सायन्स लॅब भेट दिल्या, या सायन्स लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होत आहे. भविष्यकाळात तालुकास्तरावर भव्य दिव्य प्रमाणात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिले. याचबरोबर, विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी आर्टिफिशिएल इंटेलिजन्स ही येणाऱ्या काळातील संकल्पना असून त्यावर विद्यार्थ्यानी जास्तीत जास्त भर द्यावा, असे सांगितले.

यांची होती उपस्थिती
मंचावर प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून खासदार उन्मेश पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्ष पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मार्केट सभापती सरदारशेठ राजपूत, न.पा.गटनेते संजय पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, जि.प.सदस्या मंगल जाधव, मोहिनी गायकवाड, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, पं.स.सदस्य सुभाष पैलवान, पियुष साळुंखे, सुनील पाटील, दत्तू मोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, रा.वि.संचालक सुधीर पाटील, मार्केट संचालक मच्छिंद्र राठोड, अलकनंदा भवर, नगरसेवक बापू अहिरे, नगरसेविका विजया पवार, विजया भिकन पवार, नमोताई राठोड, मुख्याध्यापक अशोक देवरे, पर्यवेक्षक वाय.आर.सोनवणे, माजी नगरसेवक निलेश महाराज, कैलास पाटील बहाळ गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य. विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन, तालुकाभरातील विज्ञान शिक्षक आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक ए.एन.देवरे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार मोरे व दिनेश बोरसे यांनी केले.

Protected Content