चाळीसगावात वृध्दाला लुटणारा भामटा पोलीसांच्या ताब्यात

chalisgaon chor

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील एसबीआय बँकेतून वयोवृध्दला एका भामट्याने हातसफाई करत हातातील पाच हजार रूपये चोरून पळत असतांना सिग्नल चौकात कर्तव्यावर असलेले ट्राफिक पोलीसांनी भामट्याला पकडल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत त्याविरोधात कारवाई करण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवारात 60 ते 65 वर्षीय वयोवध्द आजोबा बँकेच्या कामानिमित्त आले होते. त्यावेळी एक भामट्याने बाबांकडे जावून हातसफाई करत त्यांच्याजवळील 5 हजार रूपये चोरून पळला. आपले पैसे चोरले असल्याचे लक्षात येतात बाबांनी आरडाओरड सुरू करत चोरट्याला पकडा असे सांगितले. त्यावेळी सिग्नल चौकात कर्तव्यावर असलेले ट्राफिक पोलीस दिपक पाटील यांच्यासह सहकारी आणि नागरीकांनी पाठलाग कयन त्याला राष्ट्रीय विद्यालय जवळ पकडले. ट्रॅफिक सपोनि सुरेश शिरसाठ, पोलीस कर्मचारी दिपक पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांचे कौतूक होत आहे.

 

police karmchari

Protected Content