पाचोरा येथे मराठा समाज मंडळातर्फे 160 विद्यार्थ्यांचा गुणगौरव

gungaurav

पाचोरा प्रतिनिधी । येथील छत्रपती शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच समाजातील मान्यवरांचा सन्मान कार्यक्रम भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयात संपन्न झाला.

छत्रपती शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाच्या वतीने विविध परिक्षेतील 160 गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. सामाजिक व उद्योग विषयक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व विविध शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांचाही गुणगौरव करण्यात आला. विक्रीकर आयुक्त राजेश जाधव, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतुल सोनवणे, हिरामण मते यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मनोज पवार यांना “शाहू रत्न पुरस्कार -2019” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मराठा समाज बांधव, गुणवंत विद्यार्थ्यांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. याप्रसंगी सामाजिक हित जोपासणाऱ्या विविध उपक्रमांसंदर्भात चर्चा होऊन समाजातील दानशूरांच्या मदतीने विविध विधायक उपक्रम यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक उमेश गुंजाळ, प्रमुख पाहुणे उद्योजक आनंदराव मराठे, विष्णु बाळदे, बाळासाहेब मोझे(जळगाव), अशोक शिंदे, संभाजी चव्हाण, अशोक थोरात, राजेंद्र जगताप, जितेंद्र मराठे, मनोज पवार(सुरत), अशोक थोरात, राजेंद्र जगताप, जितेंद्र मराठे, मनोज पवार, आनंदराव मराठे, विष्णु बाळदे, संभाजी चव्हाण, अशोक शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाली संदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन करून गुणवंतांसाठी व सामाजिक प्रगतीसाठी सर्वांनी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील मते व्यक्त करुन मराठा समाज मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रा.एस.डी थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. दीपक मराठे व अर्जून भालसिंगे यांनी सूत्रसंचालन तर सुनील शिंदे यांनी आभार मानले.

Protected Content