विनापरवाना धारक ऑटो रिक्षांवर तात्काळ कारवाई करा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील विविध भागात सुरू असलेल्या विनापरवाना अॅटोरिक्षांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी एकता अॅटो रिक्षा चालक – मालक युनियनने आक्रमक पवित्रा घेत १७ जुन रोजी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

 

निवेदन देते प्रसंगी एकता अॅटो रिक्षा चालक – मालक युनियनचे अध्यक्ष एकनाथ सदनशिव, उपाध्यक्ष सुधाकर महाजन, सुनिल शिंदे, सचिव नाना चौधरी, सहसचिव अनिल लोंढे, कोषाध्यक्ष अशोक निंबाळकर, उपकोषाध्यक्ष गणेश पाटील सदस्य प्रविण माने उपस्थित होते.

 

पाचोरा येथील एकता अॅटो रिक्षा चालक – मालक युनियनतर्फे याआधी देखील विनापरवाना ऑटो रिक्षांवर कारवाई करण्या संदर्भात निवेदन दिलेले आहेत. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे सुध्दा निवेदन दिलेत. परंतू या विनापरवाना रिक्षा काही कमी झालेल्या नाहीत. एकता ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे शहरात जे अधिकृत स्टॉप आहेत त्याठिकाणी विनापरवाना रिक्षा थांबू देत नाही. तर ह्या रिक्षा शहरात नगरपालिके समोर, प्रविण सोडा या दुकानाजवळ, बाहेती हॉस्पीटल जवळ, जैन पाठशाळे जवळ, जामनेर रोड इ. ठिकाणी ह्या विना परवाना रिक्षा उभ्या राहतात. यामुळे जे परवानाधारक रिक्षा चालक आहेत त्यांचा व्यवसाय होत नाही. ह्या विनापरवाना रिक्षांमुळे परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच काही रिक्षा चालकांनी बँकेतर्फे व खाजगी फायनान्स कंपनीतर्फे कर्ज घेऊन नविन रिक्षा विकत घेतल्या आहेत. ते कर्ज फेडतांना व कुटुंबाचे संगोपन करतांना मोठी कसरत करावी लागते. तरी पाचोरा शहरातून ह्या विनापरवाना ऑटो रिक्षांवर कायदेशीर कारवाई करावी कारण परवाना धारक रिक्षा चालकांच्या मनात या विनापरवाना रिक्षांमुळे मोठा असंतोष आहे. आपण वेळीच या विनापरवाना रिक्षांवर कारवाई करुन त्या कायमच्या बंद कराव्यात ही विनंती. या विना परवाना ऑटो रिक्षांवर योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या नजीकच्या काळात एकता ऑटो रिक्षा चालक – मालक युनियन आपल्या कार्यालया समोर संविधानिक पध्दतीने, लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन करेल ह्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील. अशा आषयाचे निवेदन एकता अॅटो चालक – मालक युनियनतर्फे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले आहे.

Protected Content