कामगार विरोधी धोरणाविरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांची द्वार सभा

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील सीवायएम ऑफिस येथे एकाच व्यासपीठावर रेल्वेच्या पाच विविध संघटनांतर्फे सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात विशाल द्वार सभा घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

या सभेत एआयएलआरएसएच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय रेल्वेत भारत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी व कामगारांना आपल्या हक्कासंदर्भात जागृत करण्यासाठी विशाल प्रदर्शन व द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.  यात रेल कामगार सेना,  सीआरएबीसीइ युनियन, एआयओबीसीआरइए, एआयजीसी या संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या.

एलआरएसएतर्फे एस. आर. मोरे, एस. एन. बोकाडे, रेल कामगार सेनेतर्फे ललितकुमार मुथा, प्रकाश करसाळे,  सीआरएबीसीइ युनियनतर्फे पी. के. गौतम, ओबीसीचे एम.जी. प्रसाद, एम. जे. काटे, आर. बी. आव्हाड, ओबीसीतर्फे उपेन्द्र कुमार, एआयजीसीतर्फे आर. टी. साळुंखे, सी. व्ही. कापडे यांनी कामगारांच्या विविध ज्वलंत मुद्द्यांवर विस्तारपूर्वक मार्गदर्शन केले. पंतप्रधान, रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांच्या कामगार विरोधी धोरणासंदर्भात येत्या चार तारखेला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना भुसावळ येथे स्मरण पत्र देण्यात येणार आहे.

यावेळी रात्री कालीन भत्ते सिलिंग समाप्त करण्यात यावे. ठेकेदारी पद्धत बंद करावी , जुनी पेन्शन स्कीम त्वरित लागू करावी.  जो महागाईभत्ता गोठवला आहे तो तात्काळ चालू करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यशस्वीतेसाठी सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कामकाज पाहिले. सूत्रसंचालन आर.पी. गेडाम यांनी तर आभार एस. के. डांगे यांनी मानले.

Protected Content