सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नर्सरीच्या विद्यार्थ्यांचे टिळा लावून स्वागत

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केसीई. सोसायटी संचालित ओरियन सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या सुषमा कंचे यांनी शिक्षकांसाठी मोटिवेशनल प्रोग्रामचे आयोजन केले होते. तसेच शाळेच्या नर्सरीच्या विद्यार्थ्यांचे टिळा लावून स्वागत करण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी केंद्रित आराखडा कशाप्रकारे आहे , याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ओरियन सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूल ट्रेनिंग प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी शैलजा व अंशू व्यास यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शिक्षकांना आपल्या व्यस्त कामकाजाच्या शैलीमध्ये नाविन्यता आणता यावी ,प्रत्येक परिस्थितीचा सामना यशस्वीरीत्या करता येण्यासाठी त्यांच्या आंतरिक क्षमतांचा विकास व्हावा या हेतूने समर्पणध्यान(मेडिटेशन) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉ, जैन यांनी ध्यानधारणेचे महत्त्व व ध्यानधारणेची उच्च कोटीची पातळी कशा प्रकारे गाठता काढता येते यावर मार्गदर्शन करून शिक्षकांकडून ते करवून घेतले. त्याचप्रमाणे सोमवार दि. १३ रोजी शाळेच्या नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात व आनंदात शाळेत आगमन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता पाहण्यासारखी होती. विद्यार्थ्यांनी शाळेत केलेला आजचा प्रथम प्रवेश त्यांना अविस्मरणीय व्हावा त्यांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनी देखील तेवढीच तयारी केलेली शाळेचे सुंदर अशी आकर्षक सजावट करण्यासाठी शिक्षकांनी केली होती. शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना टिळा लावून त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खाऊ व त्याचबरोबर गिफ्ट पॅकेट सुद्धा दिले . शाळेत येण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून उत्सुक असलेले छोटे बाळ गोपाळ या स्वागताने भारावून गेले.
यावेळी शाळेच्या संपूर्ण प्रांगणात एक प्रकारचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी सर्व नवोदित विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस त्यांना आपले शुभाशीर्वाद दिले . त्याचबरोबर मॅनेजमेंट सदस्य डी . टी. पाटील आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर शशिकांत वडोदकर यांनी देखील विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा दिल्या .शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात व आनंदात कशाप्रकारे करता येईल यासाठी शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आप – आपली कामगिरी बजावली. शाळेच्या उपप्राचार्या सौ.माधवी लता सिट्रा यांनी देखील शाळेचा पहिला दिवस यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Protected Content