नगरदेवळा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथे आमदार निधी व जिल्हा परिषद अंतर्गत साडेतीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार किशोर पाटील व जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तत्पूर्वी नागरिकांना संबोधित करतांना आमदार म्हणाले की, नगरदेवळा गावावर विषेश प्रेम असून या मंजूर कामांसह आपल्या गावातील उर्वरित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. तसेच आपलं महाविकास आघाडीच सरकार आहे. त्यामुळं गावातील मूलभूत सुविधा व इतर कामे प्रलंबित नराहू देता लवकरच मार्गी लावेल. कार्यक्रमात गावातील मुस्लिम तरुणांनी किशोर पाटील यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला. आमदारांनी त्यांचं पक्षाचा रुमाल टाकून स्वागत केले.

नगरदेवळा गावात आमदार निधी व जिल्हापरिषद निधी अंतर्गत प्रभाग क्रं. १ मध्ये उर्दु शाळा बांधकाम करणे २४ लाख रुपये, पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख रुपये, प्रभाग क्रं. ३ मध्ये मुस्लिम बांधवांसाठी शादी हॉल बांधणे २५ लाख रुपये, कॉक्रीटीकरण करणे १५ लाख रुपये, मारोती मंदिर दुरुस्ती करणे ३ लाख रुपये, वार्ड क्रं – ४ महिला शौचालय परिसर पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख रुपये, माळी मंगल कार्यालयात पेव्हर ब्लॉक बसविणे १५ लाख रुपये, वार्ड क्रं – ६ व्यायाम शाळा बांधकाम करणे १५ लाख रुपये, बालाजी मंदिर बांधकाम २० लाख रुपये, पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम व वॉल कंपाउंड करणे ७५ लाख रुपये, संगमेश्वर बंधारा बांधणे १ कोटी ४० लाख रुपये, हिम्मतसिंग बाबा रस्ता डांबरीकरण करणे ३० लाख रुपये अशा तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

त्याप्रसंगी विधानसभा क्षेत्राप्रमुख अविनाश कुडे, शिवणारायन जाधव, सुधाकर महाजन, अब्दुल गणी शेठ, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, सुनील महाजन, राजेश जाधव, सागर पाटील, रवी पाटील, नूर बेग, वसीम शेख, धनराज चौधरी, भास्कर पाटील, अरविंद परदेशी, प्रदीप परदेशी, भारत पाटील, जितेंद्र राजपूत, राहुल राजपूत, धर्मेंद्र पाटील, सुरेश शेळके, गणेश महाले, भाऊसाहेब पाटील, विजय चौधरी, विनोद परदेशी, भैया महाजन, अशोक चौधरी, मनोज राऊळ, रोशन जाधव, नारायण पाटील, गोरख महाजन, कडू पाटील, सोनू परदेशी, अन्वर शेख, गणेश देशमुख, अफझल खान, हबीब शेठ, रउफ शेख, सागर जाधव, रईस कुरेशी, विकी जाधव, सादिक बागवान, अन्सार बेग, दगडू राऊळ, पंडित पाटील, कादर बागवान, राजेंद्र पाटील, पियुष राजपूत, गोटू राऊळ, अनिल तावडे, शेर खान, अनिल पाटील, भागवत पाटील, विनोद पाटील, विजय पाटील यांसह शिवसैनिक, नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content