भुसावळ तालुक्यातील मराठा समाजबांधव बुधवारी पाळणार निषेध दिन (व्हिडिओ)

भुसावळ, प्रतिनिधी  । तालुक्यातील मराठा समाजबांधवांची कोअर बैठकीचे आयोजन गुरुवारी सांयकाळी करण्यात आले   होते.   यात आरक्षण रद्दच्या निकालाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजबांधवानी बुधवारी आपल्या घरावर काळे झेंडे लावण्याचे व निषेधाचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. 

 बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भातील भूमिकेबद्दल चर्चा करण्यात आली.  मराठा समाजाला आरक्षण मिळणे आपेक्षित होते, परंतु,  सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठोस असे कागदपत्रे जमा करून समाजाच्या आरक्षणास पाठबळ द्यावे अशी विनंती संबधित अधिकाऱ्यांना सकल मराठा बांधव करावे असे ठरले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे मोर्चे आंदोलन न करता आरक्षणा रद्द निकालाच्या विरोधात  १९ मे रोजी प्रांत व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.  भुसावळ तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी बुधवार १९ निषेध दिवस म्हणून पाळण्याचे  ठरविण्यात आले. यात आरक्षण विरोधी जे काही झाले आहे त्याचा निषेध  करण्यासाठी बुधवारी भुसावळ तालुक्यातील मराठा बांधवानी आपल्या घरावर काळे झेंडे लावून किंवा काळ्या फिती लावाव्यात. निषेधाचा सेल्फी काढून स्टेट्स ठेवावेत असे बैठकीत ठरविण्यात आले.   जे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आरक्षणाची वाट पाहत होते अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता यावी यासाठी मदत योजना (स्काॅलरशिप ) राबविण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला प्रा. जयंत लेकुरवाळे,  जि. प. सदस्य रवींद्र पाटील,  संजय कदम, नगरसेवक  राजू आवटे,  मराठा समाज अध्यक्ष रवींद्र  लेकुरवाळे, सतीश ऊगले, अॅड.  तुषार पाटील,  समाजसेवक पंकजराव हिंगणे, रवी ढगे, ज्ञानेश्वर जगदाळे, दीनानाथ उगले,  हितेश टकले,  प्रशांत पाटी,ल  भुषण पाटील   तुषार हडप आदी उपस्थित होते. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/463355034932533

 

Protected Content