व्यापाऱ्याची दुचाकी लांबवितांना चोरट्याला रंगेहात पकडले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील घाणेकर चौकात पार्किंगला लावलेली यावल येथील व्यापाऱ्याची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबवितांना एका तरूणाला रंगेहात पकडले आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सविस्तर माहिती अशी की, अझहर खान फारूख रेहमान खान (वय-३७) रा. फालक नगर, यावल जि.जळगाव हे कटलरी किराणा मालाचे व्यापारी आहेत. व्यापार व्यवसाय असल्यामुळे ते किरणा भुसार माल घेण्यासाठी गुरूवारी १३ मे रोजी जळगाव शहरातील घाणेकर चौकात दुचाकीने आले. त्यांनी चौकातील हॉटेल सावरिया येथे दुचाकी (एमएच १९ एएफ १५८६) पार्किंगला लावली.  किराणाचा होलसेल माल घेण्यासाठी दुकानावर निघाले. दुकानावर उभे असतांना अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून गाडीला किक मारली असता दुचाकीच्या सायलेन्सरच्या आवाज अझहर यांनी ओळखला. त्यांनी दुचाकीकडे पाहिले तर चोरट्या दुचाकी घेवून पळ काढत होता. दरम्यान, त्यांचा पाठलाग करून रंगेहात पकडून शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विनेश चंपालाल बंडोर (वय-२७) रा. अंजनगाव ता. सेंधवा जि. बडवाणी (म.प्र) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अझहर खान यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content