सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

acb

जळगाव प्रतिनिधी । प्रयोगशाळा परिचर पदाच्या मान्यता आदेशावर सही करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारकडून उच्चशिक्षण विभागातील एका वरीष्ठ लिपीकाला 50 हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. ही कारवाई धुळे ॲन्टी करप्शन विभागाने केली असून पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे धुळे येथील महाविद्यालयात कनिष्ठ लिपीक म्हणून कामावर आहे. त्याच्या पदाला सहसंचालक उच्चशिक्षण विभागाने मान्यता दिली नाही म्हणून तक्रारदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 10 जानेवारी रोजी निकाल लागल्यानंतर रिक्त पदावर प्रयोगशाळा परीचर पद भरण्यासाठी तक्रारदार यांनी 14 मार्च रोजी सहसंचालक उच्च शिक्षण, जळगाव विभागातील वरीष्ठ कर्मचारी अतुल श्रीकांत सहजे (वय-49) रा. संभाजी नगर, महाबळ परीसर यांची भेट घेवून प्रयोगशाळा परिचर पदावर मान्यता आदेशावर सहसंचालक यांची स्वाक्षरी करून आदेशाची प्रत मिळावी यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी धुळे ॲन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. आज धुळे एसीबी विभागाने सहसंचालक उच्चशिक्षण विभागात दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास सापळा रचुन तक्रारदारकडून लोकसेवक तथा वरीष्ठ कर्मचारी अतुल सहजे यांनी 50 हजार रूपये घेवून टेबलाच्या ड्राव्हर मध्ये ठेवले असता ॲन्टी करप्शन विभागाने रंगेहात पकडले. पुढील कारवाईसाठी आरोपी सहजे यांना जळगाव एसीबी विभागात नेण्यात आले.

Protected Content