नशिराबाद शिवारात शॉर्टसर्कीटमुळे १० लाखाचा ऊस जळून खाक

जळगाव प्रतिनिधी । शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा स्पार्किंगमुळे शेतातील ऊसाला आग लागली. या आगीत दोन जणांच्या शेतातील सुमारे १० लाख रुपयांचा ऊस जळून खाक झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील वाहिद रज्जाक पिंजारी वय-४३ रा. म्हसावद हे शेतीकरुन उदनिर्वाह करतात. त्यांचे नशिराबाद शिवारात शेत असून गुरुवारी ३० रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काम करीत होते. याचवेळी त्यांच्या शेतालगत असलेल्या भुषण भागवत राणे यांच्या शेतातून विजेचे तार गेले आहे. वादळामुळे वीजतारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि त्यामुळे राणे यांच्या शेतातील ऊसाला आग लागली. बघताच आगीने रौद्ररुप धारण करीत शेजातील वहीद पिंजारी यांच्या शेतात देखील पसरू लागली. या आगीमुळे दोघांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी घटनेची माहिती नशिराबाद पोलिसात दिली असून त्यानुसार शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढीत तपास सुधीर विसपुते हे करीत आहे.

 

Protected Content