अरे व्वा.. आज सात तालुके निरंक; ६७ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड अहवालात आज जिल्ह्यातून फक्त ६७ कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर १५६ रूग्ण बरे होवून घरी परतलेत. आज तब्बत सात तालुक्यात एकही रूग्ण आढळून आले नाही हे विशेष.

आजची आकडेवारी
जळगाव शहर- ४१, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-२, चोपडा-९, पाचोरा-०, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-४, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-५, बोदवड-० असे एकुण ६७ रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालात जळगाव ग्रामीण, पाचोरा, धरणगाव, यावल, एरंडोल, पारोळा, बोदवड या भागात एकही रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले नाही. त्यामुळे जिल्हावासियांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मात्र जळगाव शहरात ६७ पैकी तब्बत ४१ रूग्ण आढळून आले आहे ही चिंताजनक बाब असल्याचे दिसून येत आहे. एकुण ५२ हजार ८६२ रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी ५० हजार ४०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार १९६ रूग्ण उपचार घेत आहे. आजच्या दिवशी चार रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. एकुण मृत्यूचा आकडा १ हजार २५८ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content