डांबरीकरण व शिवरस्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य- पालकमंत्री

जळगाव, प्रतिनिधी | नागरिकांना डांबरीकरण रस्त्यांच्या माध्यमातून व शेतकन्यांना आपल्या थेट बांधापर्यंत पोहचण्यासाठी शिवरस्ते हे महत्वाचे असून याच्या माध्यमातून बळीराजाच्या हिताला आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील भोकर, गाढोदा आणि भादली येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. दरम्यान, भोकर येथील ग्रामपंचायत सदस्यांह इतरांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असता पालकमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज तालुक्यातील भोकर, भादली आणि गाढोदा येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ चव्हाण, सरपंच, उपसरपंच, सुभाषआप्पा, बालाशेठ लाठी, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, गोपाळ पाटील, लोटन दाजी, अशोक पाटील, प्रवीण चव्हाण, सुनील टेलर, राजू लाठी, सुधाकर बापू, सचिन लाठी, भीमराव सोनवणे, रवींद्र सोनवणे, रंगराव पवार, अनिल पाटील, दीपक पाटील, इम्रानपिंजारी, योगेश पाटील, रवींद्र पाटील, रतीलाल पाटील, प्रभाकर सोनवणे, विकोसो युवराज पाटील, बाजार समिती माजी सभापती भरत बोरसे, प्रवीण धनगर, रमेश पाटील, रवींद्र पाटील, बाळू अहिरे, शिवाजी सोनवणे,डॉ. सत्वशील पाटील, रामकृष्ण धनगर, दतूआबा पाटील, शेखर पंडित, नंदलाल सोनवणे आदी मान्यवरांची.उपस्थिती होती.

 

 

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते गादोदा येथे तीन लाख रुपयांच्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले, भोकर गावातही पेव्हर ब्लॉकचे भूमिपुजन करण्यात आले. तर भादली येथील युवकांसाठीच्या व्यायामशाळेचे भूमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून आमोदे ते भोकर, पळसखेडा ते भोकर, भादली ते भोकर आणि आमोदा ते जामोद या शिवस्त्यांची कामे
लवकराच लवकर करण्यात येतील अशी ग्वाही दिली. भोकर येथील पुलाचे लवकरच मुख्यमंत्री उम्म्दव ठाकरें याच्या हस्ते भूमिपुजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर विठ्ठल रुखमाई मंदिर परिसरात पेव्हर उलॉकची कामे करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

दरम्यान, या कार्यक्रमात भोकर येथील सुभाष हरी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य , चेतन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य समाधान ताप, अनिल शुकदेव सोनवणे, अशोक पांडुरंग पवार, अनिल मोहाडीकर, सुकालात संदाणे आणि प्रभाकर रघुनाथ सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद सोनवणे यांनी तर आभार बालाशेठ लाठी यांनी मानले.

Protected Content