गुरुपौर्णिमानिमित्त विवेकानंद स्कूलमध्ये विविध रंगी कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । वाघ नगरातील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरूपौर्णिमानिमित्त विविध रंगी कार्यक्रमाचे आयोजन आज (दि.२३ जुलै) रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले होते. 

विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयमच्या पुर्व प्राथमिक विभागात “गुरुपौर्णिमा” साजरी करण्यात आली.  यावेळी सांस्कृतिक प्रमुख स्मिता पाटील यांनी गुरु व्यास ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पूजा चंदनकर यांनी गुरुपौर्णिमेची माहिती व धौम्य ऋषी आणि शिष्य आरुणी यांची गोष्ट सांगितली. तसेच श्रीकृष्ण व शिष्य अर्जुन, धौम्य ऋषी व शिष्य आरुणी आणि गुरु द्रोणाचार्य व शिष्य एकलव्य या आदर्श गुरुशिष्यांच्या जोड्यांची माहिती दिली. आपल्या जीवनात गुरुचे स्थान किती महत्वाचे असते, हे समजवून सांगितले. 

पूजा चंदनकर दीदी व वैशाली चौधरी दीदी यांनी “गुरु माता पिता, गुरु बंधू सखा” हि प्रार्थना म्हणून केली. याच दिनविशेष निमित्ताने ज्युनिअर के. जी. वर्गासाठी ” फॅन्सी ड्रेस ” स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  गणेश लोखंडे यांनी आपल्या मार्गदर्शन पर संवादातून ‘ आई बाबांना प्रथम नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्या , गुरुजनांचे ऐका ‘, असे मुलांना सांगितले. तसेच कोरोनाच्या काळात तुम्ही सर्व ऑनलाइन तासिका व सर्व उपक्रम उत्साहाने साजरे करतात ही खूप मोठी गुरुदक्षिणा आहे, असे बोलून मुलांचे कौतुक केले.

या स्पर्धेचे नियोजन कामिनी जावळे आणि योगिता पाटील यांनी केले होते. या स्पर्धेचे परीक्षक रुपाली देशमुख आणि वैशाली चौधरी ह्या होत्या. स्पर्धेनंतर परीक्षकांनी निकाल घोषित केला. या स्पर्धेसाठी  समन्वयिका सविता कुलकर्णी दीदी यांचे मार्गदर्शन लाभले .

Protected Content