Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक बाधित रूग्ण

कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक बाधित रूग्ण

0
104

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात एक बाधीत रूग्ण आढळला तर एक रुग्ण बरा झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज भुसावळ तालुक्यात एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७८३ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १९८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound