अरेरावी करणार्‍या बस चालकावर कारवाईची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथून बसमध्ये येणार्‍या महाविद्यालयीन तरुणींनी बस चालक अरेरावीची भाषा करत असल्याचा आरोप करत कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनानुसार दिनांक २८ मार्च रोजी कळमसरे ते अमळनेर बस क्रमांक एमएच १४ बीटी १८७४ ह्या बसने महाविद्यालयीन तरुणी व तरुण प्रताप महाविद्यालयात येत असताना वाहकाने बेल देवून ही बस चालकाने बस थांबवली नाही. याबाबत विद्यार्थिनींनी विचारणा केली असता तुम्ही मुली आमच्यावर उपकार करायला येतात का ? असे सांगत अरेरावी केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी यावेळी केला.

या अनुषंगाने, ह्या मार्गाने येणार्‍या प्रताप महाविद्यालयाजवळ नियमित थांबव्यात तसेच सदर चालकावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपस्थित तरुणींनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही निवेदनातून दिला आहे.निवेदन सहायक वाहतूक अधीक्षक सी. एच. चौधरी यांनी स्वीकारले. सदर निवेदनाची प्रत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनाही देण्यात आली आहे. यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content