गिरणा नदी पात्रातून तराफेच्या सहाय्याने वाळूची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळूची तराफेच्या सहाय्याने चोरी करतांना आढळून आल्याची घटना सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. असे असतांना वाळूमाफियांनी नविन शक्कल लढवत लाकडांचे तराफा बनवून त्यावरून वाळूची वाहतूक करून चोरी करत असल्याचे समोर आले आहे. जळगाव तालुक्यातील धानोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून तराफेच्या सहाय्याने वाळूची चोरी होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महसूल विभागा आणि तालुका पोलीसांना  धानोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून तराफेच्या सहाय्याने वाळूची चोरी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलीसांनी १ ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहे.

 

Protected Content