जाचाला कंटाळून विवाहितेची विष घेवून आत्महत्या; पती पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । चारीत्र्यावर संशय घेऊन पती जाच करीत असल्यामुळे पत्नीने विष प्राषण करुन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता शहरातील वानखेडे हौसिंग सोसायटी येथे ही घटना घडली. विवाहितेच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कविता योगेश नेटके (वय ३०, रा. वानखेडे हौसिंग सोसायटी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. कविता यांचे वडील मधुकर वानखेडे (रा. मेहरुण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता व योगेश पती-पत्नीमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते. योगेश हा तीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन सतत तीचा छळ करीत होता. या जाचास ती कंटाळली होती. दरम्यान, आज २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कविता यांनी बाथरुममध्ये विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस येताच कुटुंबीयांनी तीला अत्यवस्थ अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कविताच्या मेहरूण मधील माहेरच्यांनी प्रचंड अक्रोश केला. तीचा पती योगेश याच्या जाचास कंटाळुनच तीने आत्महत्या केल्याचा आरोप विवाहितेचे वडील मधुकर वानखेडे यांनी केला आहे. योगेशवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वानखेडे कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. कविताच्या कुटुं बीयांचे जबाब घेण्यात आले. जिल्हापेठ पोलिसांनी योगेश नेटके याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.