जळगाव रेल्वे स्थानकातून बालिकेचे अपहरण करणाऱ्या संशयिताचे फोटा, रेखाचित्र जारी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकावरून १६ जून २०१९ रोजी पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र व फोटो स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी जारी केले आहे. या संशयिताची माहिती देण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे.

याबाबत माहिती अशी की, १६ जून २०१९ रोजी दुपारी १२.४५ वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर एक तरुण आपल्या पाच वर्षीय मुलीसह आला होता. त्यांना जयपुर येथे जायचे असल्याने फलाट क्रमांक तीनवर ते बसले होते. प्रकृती खराब असल्यामुळे या तरुणास झोप लागली. तर याच दरम्यान, एका भामट्याने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतले. या भामट्याने बालिकेस गोवा एक्सप्रेसमध्ये बसवुन तीचे अपहरण केले. त्याने अपहरण केलेली मुलगी पाच वर्षांची आहे. तीची उंची २ फुट ३ इंच आहे. रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण करणाऱ्या भामट्याचे फोटो, रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. भामटा सुमारे ३५ ते ४० वयोगटातील आहे. त्यांची उंची ५ ते ६ फुट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. या संशयिताची माहिती देण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content