इंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा !

संगमनेर (वृत्तसंस्था) सम आणि विषम तिथीच्या सूत्रातून अपेक्षित संततीप्राप्तीच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेलेले किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना संगमनेर न्यायालयाकडून थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती मिळाला आहे.

 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात इंदोरीकरांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना २० ऑगस्टची तारीख देत खालील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदोरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर न्यायालयात येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसह राज्यभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात पीसीपीएनडीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Protected Content