ग.स. सोसायटीच्या निवडणूक : ३७ उमेदवारी अर्ज दाखल

 
जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात ग.स.सोसायटी निवडणूकीची प्रक्रियेची शुक्रवार २५ मार्च पासून सुरुवात झाली आहे. बुधवार ३० मार्च रोजी ४६ अर्जांची विक्री झाली असून ३७ नामांकन अर्ज इच्छुकांनी दाखल केले असल्याची माहिती सहकार विभाग प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात सर्वात मोठी सरकारी नोकरांची सोसायटी असा नावलौकिक असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया शुक्रवार २५ मार्च पासून सुरु झाली असून उमेदवारी नामांकन अर्ज विक्री आणि स्वीकृतीसाठीची मुदत ३१ मार्च अखेर केवळ १ दिवस शिल्लक आहे.
जिल्ह्यात ग. स. सोसायटीचे ३२ हजार ४४ सभासद आणि निवडणूक मतदानासाठी पात्र मतदार आहेत. २९ रोजी ५५ अर्ज विक्री असून १२० नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले आहेत. तर बुधवारी ४६ अर्ज विक्री झाले असून ३७ नामांकन अर्ज इच्छुकांकडून दाखल झाले असल्याचे सहकार विभाग जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी माहिती दिली.

Protected Content