राजदेहरे येथील सर्वेश्वर महादेव मंदिराच्या जिर्णोध्दाराचा सोहळा उत्साहात

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील राजदेहरे येथील पाश्चात्य काळातील सर्वेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धार सोहळा श्रीनाथ महाराज व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवार रोजी उत्साहात संपन्न झाला.                    

तालुक्यातील राजदेहरे येथील ७५० वर्षापूर्वीचे पुरातन सर्वेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळा बुधवार, ७ रोजी श्रीनाथ महाराज, आमदार मंगेश चव्हाण व शेकडो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी श्रीनाथ महाराजांचे  आशिर्वाद घेऊन बालब्रह्मचारी श्रीनाथ महाराज यांच्या वास्तव्याने श्रीक्षेत्र श्रावणतळे परिसरात आध्यात्मिकचे महत्व वाढले आहे. त्यांच्या प्रेरणेने आता सर्वेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार होत असून लवकरच याठिकाणी मोठे अध्यात्मिक केंद्र निर्माण होणार आहे. भक्तांनी मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी वर्गणी गोळा करून दिलेला योगदान हा वाखाणण्याजोगा असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले. तसेच आमदार म्हणूनच नव्हे तर एक वारकऱ्याचा मुलगा या नात्याने सदर परिसराच्या धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवाजी नाना हडपे, अनिलभाऊ नागरे, संतोष मोकाटे, ज्ञानेश्वर बागुल, ज्ञानेश्वर माने, काशिनाथ फत्तू, सोमनाथ दत्तू, रमेश बन्सी राठोड, अप्पासाहेब माने, संतोष देशमुख, संग्राम पदंम जाधव व मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

 

 

Protected Content