व्हेंटीलेटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व तत्सम साहित्य खरेदीतील संभ्रम दूर करा – आमदार चिमणराव पाटील

पारोळा, प्रतिनिधी | कोरोना काळात व्हेंटीलेटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व तत्सम साहित्य खरेदी संदर्भात नागरिकांचा संशय व संभ्रम झाला असून तो दूर करण्यात येवून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ. चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, कोरोना काळात व्हेंटीलेटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व तत्सम साहित्याची अवाजवी दराने मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आल्याच्या बातम्या दररोज प्रसिध्द होत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संशयाचे व संभ्रमाचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच यामुळे जिल्हा नियोजन समिती, आरोग्य विभाग यांसह प्रशासनाची बदनामी होत आहे. नमानसात शासनाची प्रतिमा मलीन होत आहे. सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करून खुलासा करण्यात यावा व संभ्रम दूर करावा. तसेच सदर प्रकरणी गैरव्यवहार झाला असल्यास दोषींवर कारवाई करण्यात यावी, त्यामुळे जनमानसातील संशायचे व संभ्रमाचे निराकरण होईल अशी मागणी केली आहे.

Protected Content