पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली अपघातात जखमींची विचारपूस

बुलढाणा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  समृध्दी महामार्गावरील भयंकर अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने या अपघातातील जखमींची विचारपूस केली. तसेच समृध्दी महामार्गावरून होणार्‍या अपघातांच्या संदर्भात वेळ पडल्यास कडक कायदे करण्यात येतील अशी ग्वाही दिली.

 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा येथे समृध्दी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला. यत २६ जणांच्या मृत्युमुखी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असताना .जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जखमींना भेट देण्यासाठी बुलढाण्यातील शासकीय रुग्णाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी असे अपघात रोखण्यासाठी अजून कडक कायदे करण्याची वेळ आली तर ती निश्चित केल्या जातील व दोषींना यामध्ये कठोर शासन केल्या जाईल असे  बोलताना सांगितले.

तसेच समृद्धी महामार्ग दळणवळण करतात करता एक वेगवान महामार्ग म्हणून राहो अपघात घडण्याचे प्रमाण कसे कमी करण्यात येतील याचा देखील विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घटनास्थळी ला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. झालेली घटना अत्यंत मनाला खेद देणारी असून अशा भयानक अपघात भविष्यात रोखण्याकरिता सर्व त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

Protected Content