महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धुमस्टाईल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भगवान नगरात असलेल्या किलबिल शाळेजवळ एका शिक्षिकेतच्या गळ्यातील ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याची पोत अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येवून धुमस्टाईल लांबविली. ही घटना शुक्रवारी ३० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामांनद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील नवीन भगवान नगरात रोहिणी विजयकुमार नारखेडे (वय-३९) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. शुक्रवारी ३० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रोहिणी नारखेडे या भगवान नगरातील किलबिल शाळेजवळून पायी जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची पोत जबरी हिसकावून पसार झाले. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही संशयित हे दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान, महिलेने लागलीत रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देखमुख करीत आहे.

 

Protected Content