आम्ही मलम लावण्याचे काम करतो, आसूड ओढण्याचे नाही ! : केसरकर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाचे शिलेदार दीपक केसरकर यांनी आज पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

आज दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमचे विचार बाळासाहेब ठाकरे यांचे असल्यामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल. आम्ही म्हणजे सर्वस्व हे चालत नाही. बाळासाहेब ठाकरे हे जनतेला आपले वाटायचे.

केसरकार पुढे म्हणाले की, एका क्लिकवर शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा केले. काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारवर लिहून रोष ओढवून घेतला होतं. खर्‍या अर्थाने आता जनतेच्या मनातील सरकार आले आहे. नागरिकांना हे आपलं सरकार वाटतं. आम्ही नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आम्ही आसूड ओढण्याची भाषा करत नाही. अडीच वर्षे सत्तेत होते, पण शेतकर्‍यांना मदत केली नाही. शेतकर्‍यांबाबत बोलत रहायचं पण शेतकर्‍यांसाठी काही करायचं नाही. बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवतोय. बोलणं आणि करणं यात फरक आहे. बोलणारे सरकार आणि करणारे सरकार यातला फरक दिसत असल्याची टीका देखील त्यांनी केली.

 

 

Protected Content