शॉर्टसर्किटमुळे १८ क्विंटल कापूस जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील फुफनगरी येथील एका शेतकऱ्याने अंगणात सुकवण्यासाठी टाकलेल्या कापसाला शॉर्टसर्किटमुळे अचानकपणे लागलेला आगीतमुळे १८ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रविवार २३ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र माणिक चौधरी (वय-५०) रा. फुपनगरी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यानी शेतामध्ये कापसाची लागवड केली होती. रविवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांनी अंगणामध्ये कापूस सुकवण्यासाठी टाकले होते. त्यावेळी अचानक महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोल वरून शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या कापसाला अचानकपणे आग लागली.या आगीमध्ये १८ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता अकस्मात आगीची नोंद करण्यात
आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करत आहे.

Protected Content