एरंडोल येथे काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहर काँग्रेस, युवक काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा अध्यक्ष अँड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.

कॉग्रेस पक्षाच्या शहर, जिल्हा पदाधिकारी महिला कॉग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, मागासवर्गीय विभाग, सेवा दल इत्यादी आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी हजर होते.            

याप्रसंगी एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन , डॉ फरहाज बोहरी , आर.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व केंद्र सरकारने केलेल्या डीज़ल व पैट्रोल दरवाढ चा निषेध व घोषणा देण्यात आल्या

या प्रसंगी एरंडोल पारोळा युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख इमरान सैय्यद, डॉ.राजेंद्र चौधरी, डॉ सुधीर काबरा , रईस कंडक्टर, माजी नगर सेवक ऐजाज शेख, संजय कलाल, शेख़ सांडू, मदन भावसार,राजू मनुधाने,सुनील पाटिल बाम्हने,एरंडोल शहर काँग्रेस अध्यक्ष संजय भदाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सुदर्शन महाजन यांनी आभार मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!