मुक्ताईनगरात महावितरण विरोधात शिवसेनेचे आंदोलन (व्हिडिओ)

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । सत्ताधारी पक्षाचा असलो तरी महावितरण प्रशासनाच्या वसुलीच्या धोरणाला विरोध आहे असे सांगत आज आमदार चंद्रकांत पाटील य्यानी आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले

ऐन कोरडवाहू शेतीच्या पेरणीच्या तोंडावर शेतकर्‍यांकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली थांबविण्यात यावी या मागणीसाठी आज शहरातील प्रवर्तन चौकात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलन जोरदार घोषणाबाजी करून वीज वितरण प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की , महावितरणच्या धोरणानुसार एकरकमी ३ बिलांची रक्कम शेतकऱ्यांना आताच भरणे शक्य नाही सध्या शेतीच्या पेरणी आणि मशागतीसाठी करावा लागणारा खर्च महत्वाचा आहे अगदी चीजवस्तू गहाण ठेऊन , व्याजाने किंवा उसनवार घेऊन शेतकरी पेरणी आणि मशागतीची , खर्चाची बरोबरी करत असतो हे महावितरणने लक्षात घ्यावे त्यांनी फक्त एका बिलाची मागणी केली तर आम्हीपण सहकार्य करू एक बिल शेतकरी भरू शकतील मात्र वीज खंडित करणे अजिबात सहन करणार नाहीत नेहमी शिवसेना शेतकऱ्यांसाठी झगडत आली आहे आताही आम्ही त्याच भूमिकेतून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आलो आहोत मी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी महावितरणची ही सक्तीच्या वसुलीची भूमिका मान्य नाही मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला शेतकऱ्यांच्या अडचणींवर आक्रमक भूमिका घ्यायला सांगितले आहे आता मी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मार्फत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणार आहे आणि महावितरणचा हा सक्तीच्या वसुलीचा आग्रह मोडून काढणार आहे

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली आक्रमक आंदोलनाची भूमिका , २ दिवसांपूर्वी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांनी केलेले आंदोलन आणि आज मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले आंदोलन लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महावितरणावरील संताप तीव्र होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे .

Protected Content