खा. भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीचे छापे

वाशीम | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने आज छापे टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कालच अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर आज टाकण्यात आलेल्या या छाप्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना ऍग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचे वृत्त आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

Protected Content