उद्धव ठाकरेंनी फोनवरून पवारांकडे व्यक्त केली नाराजी

sharad pawar and uddhav thackeray

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेला सोमवारी हात हलवत माघारी यावे लागल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोनवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादीने पाठिंब्याचे पत्र दिले असते, तर किमान सत्तास्थापन करण्याच्यादृष्टीने पाऊल तरी टाकता आले असते,असं शिवसेनेचं म्हणने आहे.

 

शिवसेनेच्या या फजितीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी बदललेली भूमिका कारणीभूत मानली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड नाराज झाल्याचे समजते. त्यांनी फोनवरून शरद पवार यांना ही नाराजी बोलून दाखवल्याचेही समजते. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेशी मंगळवारी सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्तास्थापन होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या गोटात सध्या शांतता आहे.

Protected Content