चोपडा येथे 6 डिसेंबरला लालबावटा शेतमजूर युनियनचे तालुका अधिवेशन

चोपडा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनची नुकतीच झुम मीटिंग घेण्यात आली. या मिटिंगमध्ये ठरविण्यात आले की,”6 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा भारतीय खेत मजदूर युनियन तर्फे राज्यात सामाजिक समता दिन म्हणून पाळण्यात यावा. तसेच याच दिवशी युनियनचे तालुका अधिवेशन असणार आहे. 

या मिटींगला कॉम्रेड नामदेव चव्हाण, काँ. राम बाहेती, काँ. राजन क्षीरसागर, काँ हौसलाल रहांगडाले, काँ. संजय मंडवधरे व काँ. शिवकुमार गणवीर अमृत महाजन हे जॉईन झाले होते. या मिटिंगमध्ये ठरविण्यात आले की,”6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा भारतीय खेत मजदूर युनियन तर्फे राज्यात सामाजिक समता दिन म्हणून पाळण्यात यावा. या दिवशी तालुका, जिल्हा स्तरावर मेळावे, सभा,मिटिंग घेऊन वर्तमान सामाजिक राजकीय परिस्थितीचे व समाजातील मागास व दुर्बल घटकांवर, महिलांवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावे. 

त्याचप्रमाणे 6डिसेंबर2020 ते 25 डिसेंबर2020 पर्यंत राज्यात महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनची तालुका जिल्हाअधिवेशने घेऊन तालुका कार्यकारिणी तयार करावी, सभासद नोंदणी करा असा निर्णय घेण्यात आला त्यानुसार मोहिदा येथे परिसरातील शेतमजूर प्रमूख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत ठरले की 6 डिसेंबर रविवार ला चोपडा येथे धनगर समाज मंदिरात तालुका शेतमजुरांच्या अधिवेशन घ्यावे व त्यासाठी एडवोकेट कॉ मदन परदेशी ,संतोष पाटील ,लक्ष्मण शिंदे ,नेताजी कोडी, अर्जुन दादा कोळी , जे डी ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला,काँ.अम्रुत महाजन वासुदेव कोळी गोरख वानखेडे रतिलाल भिल भागवत पाटील नामदेव चंद्र पाटील. आशाबाई पाटील यांची उपस्थिती होती दिनांक 16 रोजी येथे कार्यकर्ता शिबिर आणि मोहिदि आजंतीसिम वडोदा गावी शेत्मजुर युनियन किसान सभा शाखा फलक अनावरण करण्याचे ठरले वडोदा येथे रात्री सभा घेण्याचे ठरले आहे.

Protected Content