डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई करा : राष्ट्रवादीची मागणी

यावल, प्रतिनिधी । मुंबईतील ऐतिहासिक राजगृहावर काही समाजकंटकांनी धुडगूस घालून झालेल्या तोडफोडीचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार जितेन्‍द्र कुवर यावल यांना निवेदन देऊन करण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ऐतिहासिक महत्त्वाच्या राजगृह या निवासस्थानी तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाज घातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेबांनी या वास्तूमध्ये जपून ठेवला असून महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्र आहे. महामानव बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाज मनात खोलवर रुजलेल्या आहेत. आम्हा सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही. भारतवासी यांची अस्मिता असलेल्या राजगृह या स्मारकावर प्रवृत्तीच्या काही समाजकंटकांनी धुडगूस घालून भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो व पुरोगामी चळवळीच्या प्रेरणास्थळावर ज्या अविचारी प्रवृत्तीने हा हल्ला केला. त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पुरोगामी महाराष्ट्रात झालेल्या घटनेतील आरोपींना आघाडी सरकारने तातडीने अटक करून त्यांना कडक शासन करावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावल तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी प्रा. मुकेश येवले तालुका अध्यक्ष , दिनकर सिताराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी ,सुखदेवजी नाना बोदडे ,अब्दुल सईद भाई, ऍड. देवकांत पाटील, फैजपूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अन्वर खाटीक, अशोक भालेराव सामाजिक न्याय विभाग , सारंगधर अडकमोल ,कामराज घारू ,डॉ हेमंत येवले , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निवृत्ती धांडे माजी नगरसेवक अकबर खाटीक , बापू जासूद ,अरुण लोखडे ,सुरेखा पारधे ,शिवराम वैदू किशोर माळी ,आशुतोष पाटील ,राकेश सोनार ,शरीफ तडवी ,गुलशेर धांडे ,महेंद्र तायडे, विजय साडी ,राहुल गजरे, पितांबर महाजन ,प्रशांत पाटील ,हितेश गजरे अयुब खान आदी उपस्थित होते.

Protected Content