Home Cities जळगाव पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जळगावात जाहीर व्याख्यान

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जळगावात जाहीर व्याख्यान

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवाद’ या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते आणि राष्ट्रवादी विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान येत्या ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचे आयोजन बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाला ॲड. अनिकेत निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील हिंदू समाजामध्ये पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या विचारांना मोठा प्रतिसाद मिळत असून, हिंदू समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच भारतीय संस्कृती, प्राचीन वारसा, सनातन धर्म आणि राष्ट्रहित यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले आहे. हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित करणाऱ्या विचारांचा लाभ जळगावकरांना या व्याख्यानाच्या माध्यमातून घेता येणार आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्याख्यानासाठी कोणत्याही प्रकारचे पासेस उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. कार्यक्रम संपूर्ण हिंदू समाज, माता-भगिनी आणि युवा वर्गासाठी पूर्णपणे खुला आहे. सभागृहातील पहिल्या तीन रांगा प्रायोजकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, उर्वरित आसनव्यवस्था सर्वांसाठी खुली राहणार आहे. त्यामुळे ‘आधी येणाऱ्यास आधी प्राधान्य’ या तत्त्वावर उपस्थितांना आसनव्यवस्था मिळणार आहे.

बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी सातत्याने कार्यरत आहे. या भव्य व्याख्यान कार्यक्रमासाठी ॲड. ओम त्रिवेदी, श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., आर्किटेक्ट नितीन पारगावकर, संजय व्यास, नंदलाल अडवाणी आणि सपन झुनझुनवाला यांचे प्रायोजकत्व व सहकार्य लाभले आहे.

या व्याख्यानातून जळगावकरांमध्ये राष्ट्रीय विचारांची नवचेतना निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जळगाव शहर व परिसरातील सकल हिंदू बांधव, माता-भगिनी तसेच युवक-युवतींनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह या व्याख्यानास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound