अपघातात जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू

चोपडा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा-शिरपूर मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या बिडगाव येथील शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील शिव कॉलनीमधील रहिवासी व बिडगाव येथील ओं. गो. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र रामचंद्र वाघ (वय ४८) हे पत्नीसह ५ रोजी सायंकाळी जुना हरेश्वर रस्त्याने पायी फिरायला गेले होते. संस्कार मंडपम या मंगल कार्यालयाजवळून घराकडे परत येत असताना अरुंद पुलाजवळ त्यांना चोपड्याकडे येणार्‍या एका अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना मागून जबर धडक दिली.

या अपघातात जबर जखमी झाल्यामुळे त्यांना तत्काळ उपचारार्थ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ६ रोजी पहाटे २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या २६ वर्षापासून ते इंग्लिश विषयाचे अध्यापन करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ४ भाऊ असा परिवार आहे. राजेंद्र वाघ यांच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content