जळगाव जिल्हाधिकारी, तालुकास्तरीय व महापालिका आयुक्तस्तरावरील ‘लोकशाही दिन’ रद्द

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी, तालुकास्तरीय व महापालिका आयुक्तस्तरावरील ‘लोकशाही दिन’ रद्द करण्यात आला आहे.

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार, दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने ‘दृकश्राव्य’ माध्यमातून होणारा जिल्हाधिकारी स्तरावरील व तालुकास्तरावर होणारा ऑफलाइन ‘लोकशाही दिन’ तसेच महापालिका आयुक्तस्तरावरील ‘ऑफलाइन’ लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Protected Content