गानकोकिळा अनंतात विलीन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताची गानकोकिळा म्हणून ख्यात असणार्‍या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी छत्रपती शिवाजी मैदानावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्यासह मान्यवर आणि लाखोंच्या जनसमुदायाची उपस्थिती होती.

लतादिदींच्या पार्थिवावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

शाहरुख खान, जावेद अख्तर अशी अनेक मंडळी छत्रपती शिवजी पार्कवर दाखल झाल्याचे दिसून आले. यावेळी भारतरत्न सचिन तेंडूलकरही यांनीही हजेरी लावत आदरांजली वाहिली. राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने उद्या सोमवार ७ फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

Protected Content