संदीप देशपांडेंनी पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज ठाकरे यांच्या इशार्‍यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असतांनाच मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हातावर तुरी दिल्याचे दिसून आले.

राज्यात राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यावरून दिलेल्या इशार्‍यानंतर वातावरण तापलं आहे. आज मनसेने आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी भोंग्याविरोधात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यात राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संदीप देशपांडे यांचा देखील शोध पोलीस घेत होते.

दरम्यान, संदीप देशपांडे हे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देशपांडे दाखल झाले. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बाहेर येत देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर तत्काळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र देशपांडेंनी पोलीस पाठीमागे पळत असतानाचा गाडीत बसून थेट पळ काढला. या सर्व गदारोळात एक महिला पोलीस खाली पडली. तर बराच वेळ गोंधळ उडाला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: