विमानसेवेला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रवाशांचे स्वागत (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 01 at 1.49.10 PM

जळगाव, प्रतिनिधी | ट्रू जेट कंपनीतर्फे जळगाव ते मुंबई विमान सेवेस आज खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. जळगाव ते मुंबई जळगाव ते अहमदाबाद अशा दोन ठिकाणावर ही सेवा सुरू झाली आहे. या सेवेला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मान्यवरांनी प्रवाश्यांचे बुके देऊन स्वागत केले.

ट्रू जेट कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुक करण्याची सेवा उपलब्ध आहे. अनेक नागरिकांनी ऑनलाईन तिकीट बुक केले. गोपाल तेली हे ट्रूजेटचे जळगाव ते मुंबई या फेरीचे प्रथम प्रवाशी ठरले. गोपाल तेली यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, यापुर्वी रेल्वे किंवा बसने मुबई येथे जाण्यासाठी साधारणतः १४-१५ तास लागत होते. ट्रूजेटचा जळगाव येथील पहिला प्रवासी असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. विमान सेवा सुरु झाल्याने पर्यटन, उद्योग यात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल असे मत तेली यांनी मांडले. तसेच दुसऱ्या प्रवासी सीमा लक्ष्मण उपाध्याय यांनी सांगितले की, रेल्वेने प्रवास करतांना अधिक वेळ लागत होता. मात्र, विमान सेवा सुरु झाल्याने आर्ध्या ते एकतासात आम्ही मुंबई पोहचू. जळगाव ते पुणे विमान सेवा सुरु करण्यात यावी अशी अपेक्षा यांनी मांडली.

विमान सेवेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार उन्मेष  पाटील यांनी सांगितले की, जळगावचा विकास करायचा असल्यास विमानसेवे शिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी मी संसदेत विमान सेवेचा मुद्दा मांडला अन् विकास विमानसेवेसाठी आवश्यक परवानगी संबंधित विभागाने दिल्या. यामुळे विमानसेवा सुरू झाली आहे. जळगाव ते पुणे विमान सेवेबाबत ती लवकरच होईल. विमानाच्या नाईट लँडिंगबाबत २२ प्रकारच्या परवानगी लागतात त्यापैकी १८ परवानगी मिळाली आहे. त्वरित परवानगी मिळताच शेतमालाची आवक जावक विमानाने सुरू करता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आमदार चंदुलाल पटेल जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, भरत अमळकर, विमानतळाचे अधिकारी सुनील माग्गीवर, गनी मेनन आदी उपस्थित होते. जळगाव ते मुंबई व मुंबई ते कोल्हापूर अशी सेवा ही पुढे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. यासोबतच हैदराबाद पुणे विमानसेवा जळगाव मार्गाने करण्याचेही नियोजित आहे. यातून व्यापारी, विद्यार्थी, नागरिक यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. उद्योजक विद्यार्थ्यांसाठी पुणे सेवा लवकरच सुरू करणार असल्याचेही खा. पाटील यांनी पुढे मांडले. दरम्यान, अहमदाबादा  येथून प्रवास करून आलेल्या तसेच मुंंबईकडे प्रयाण करणाऱ्या प्रवाशांचे मान्यवरांनी बुके देऊन स्वागत केले. बंदोबस्त महाराष्ट्र सुरक्षा बालाचे अधिकारी प्रमोद पाडर, सुहास पाटील, राहुल महाजन, एमआयडीसी एपीआय रणजीत शिरसाठ तसेच महाराष्ट्र सुरक्षा बालाचे कर्मचारी तैनात होते.

 

Protected Content