उद्योग

उद्योग जळगाव सामाजिक

अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलन

जळगाव (प्रतिनिधी) आज १० फेब्रुवारी रोजी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संध्याकाळी भाऊंच्या उद्यानात मुशायरा (कविसंमेलन) चे आयोजन करण्यात आलेले आहे. अशोकभाऊ जैन यांच्या ५६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सायंकाळी ५.३० वाजता भाऊंच्या उद्यानात मुशायरा( कविसंमेलन) चे आयोजन जळगाव जिल्हा मनियार बिरादरी व अमृत धारा यांच्या सयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या मुशायऱ्यात जळगावातील नावाजलेले कवी-शायर हे सह्भागी होणार आहेत. सदर मुशायरा सर्वासाठी खुला असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख व अमृत धाराच्या अध्यक्षा डॉ. प्रियांका सोनी यांनी केले आहे.

उद्योग जळगाव

Birthday Special अशोकभाऊ जैन : प्रेरणादायी अष्टसूत्री

जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा आज वाढदिवस. जळगावचे नाव जागतिक नकाशावर ठसविण्यात मोलाचा वाटा असणार्‍या या उद्योग समूहाची धुरा समर्थपणे सांभाळणार्‍या भाऊंच्या व्यक्तीमत्वातील अतिशय प्रेरणादायी अशा आठ पैलूंचा लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने घेतलेला हा आढावा १) …घेतला वसा टाकू नका !– दिवंगत मोठेभाऊ भवरलालजी जैन यांनी एका मोठ्या उद्योग समूहाची पायाभरणी करून याला भरभराटीस आणले. वैयक्तीक व व्यावसायिक पातळीवर देदीप्यमान वारसा त्यांनी अशोकभाऊंसह आपल्या पुढील पिढीकडे हस्तांतरीत केला. खरं तर, वारसा हा अनेकांना मिळत असतो. तथापि, यासोबत मिळालेला वसा कायम राखण्याचे काम फार थोडे करतात. याच मोजक्या मान्यवरांमध्ये अशोकभाऊ जैन यांचा समावेश होतो. व्यवसायात यश संपादन करतांना आपण समाजाचे काही […]

उद्योग जळगाव सामाजिक

‘खान्देश उद्योग रत्न’पुरस्काराने अशोक जैन यांचा सन्मान

जळगाव ( प्रतिनिधी) शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात जैन उद्योग समूहाचे अनमोल कार्य असून त्यांनी उद्योग समूह वाढवताना भूमिपुत्रांना रोजगार देण्यास प्राधान्य दिले आहे, देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास डॉ. भवरलालजी जैन यांचे कार्य नोंद घेण्यासारखे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कल्याण येथील उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्यावतीने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा ‘खान्देश उद्योग रत्न’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.   मानपत्र, स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला पुरस्कार कल्याण आणि पंचक्रोशीतील हजारो खान्देशवासीयांच्या साक्षीने अशोक जैन यांनी स्विकारला. अशोक जैन यांनी सत्काराच्या मनोगतात सांगितले की शेती, शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून डॉ. भवरलालजी जैन यांनी कंपनीचा मुहुर्तमेढ […]