धरणगावात मुद्रांक विक्रेता संघटनेचे धरणे आंदोलन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाने १०० व ५०० रूपयांचे स्टॅम्प बंद करण्याच्या निर्णया विरोधात राज्यात मुद्रांक विक्रेत्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणगाव मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखक संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद करण्यात येणार असून या स्टॅम्पऐवजी फ्रँकिंग मशिनचा (Franking machine) वापर करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या शासकीय विश्राम गृहात माहिती दिली होती. परंतू शासनाच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान राज्यात मुद्रांक विक्री करून अनेक जण आपला उदरनिर्वाह करतात. मुद्रांक बंद झाल्यास मुद्रांक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने याचा विचार करून १०० व ५०० रूपयांचे ट्रॅम्प बंद करून नये अशी मागणी केली जात आहे. या अनुषंगाने सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणगाव मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखक संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येवून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी प्रमोद साळुंखे, नितीन पाटील, सुनिल बडगुजर, राजेंद्र मोरे, मांगो मोरे, शेख इकबाल महेमद, संजय पाटील, विक्रमसिंग पाटील, काशिनाथ मराठे, अंकुश चव्हाण, रोहिदास सोनवणे, विक्रमचंद्र बन्सी, अनिल पाटील, अनिल महाजन, दत्तात्रय चौधरी, अनिल चौधरी, रविंद्र महाजन, गौतम सपकाळे, विनायक बागुल, विलास पवार यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content