आसोदा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे.

या केंद्राचा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडलं आहे. यात जळगाव च्या आसोद्या येथील निमाजाई फाऊंडेशनच्या  केंद्राचेही ऑनलाईन पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जळगाव तालुक्यातील तसेच आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थाची तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण एलईडीस्क्रीनच्या माध्यमातून ऑनलाईन ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासंदर्भात निमजाई फाऊंडेशनच्या संचालिका शितल पाटील-बाक्षे यांनी बोलतांना दिली आहे.

Protected Content