जळगाव ते शेगाव पालखी सोहळा व पायी दिंडी रवाना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जय गजानन संत्सम मंडळाच्या वतीने मेहरूण येथील पेट्रोल पंप येथून रविवारी १ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता जळगाव ते शेगाव पायी दिंडी व पाखली रवाना झाली. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगणांची उपस्थिती होती.

जळगाव शहरातील जय गजानन संत्सम मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने नवीन वर्षाच्या पहिल्या रविारी देखील जळगाव ते शेगाव पालखी सोहळा आणि पायी दिंडी काढण्यात आली. रविवारी १ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरातील मेहरूण येथील पेट्रोल पंप येथून पायी दिंडीला सुरूवात करण्यात आली. या पायी दिंडीत २०० भाविकांनी सहभाग नोंदविला. समाजाच्या प्रती काही देणे लागते म्हणून पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यामातून स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव आणि आरोग्य याबाबत जनजागृती देखील करण्यात येते. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जय गजानन संत्सम मंडळाचे पिंटू भाऊ, भगवान मराठे, संदीप भामरे, पी.जे. पाटील, बापु मराठे, भगवान मराठे, युवराज पाटील, गुलाबराव पाटील, तुषार बोरसे, संजय पवार, नंदकुमार उदार, एस.आर. पाटील, रवी पाटील, नितीन पाटील, अनिल माळी, रामचंद्र माळी यासह इतर भाविक परिश्रम घेत आहे.

Protected Content