बोहरा गल्लीतून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बोहरा गल्लीतून एका मजूराची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, योगेश बाबुराव पाटील (वय-४५) रा. इंद्रप्रस्त नगर जळगाव हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ते बोहरागल्लीत कामाला (एमएच १९ एमएम १३१८) दुचाकीने गेले. दुचाकी पार्किंगला लावली होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर दिसून आली नाही. दरम्यान, परिसरात शोधाशोध केली असता दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे. 

Protected Content