दीपावलीच्या सुट्टीमध्ये देखील वीज बिल भरण्याची सुविधा

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज बिल भरण्यासाठी दिपावलीच्या काळात सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

वीज वितरणला ग्राहकांकडून अनेक वेळा विविध उपायोजना करून थकीत बिल वसूल करावे लागतात. आणि त्यात दिवाळी म्हटलं की, अनेक घटकांकडे पैशाची व्यवस्था असते. थकीत बिल या दिवसात ग्राहकांकडून कार्यालयीन सुट्टीच्या दिवसात देखील त्यांना ठराविक वेळ उपलब्ध करून दिली. तर वीज बिल वसूल होऊ शकते. या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विभागीय कार्यकारी अभियंता वीरेंद्र जसमतीया यांच्या मार्गदर्शनात खामगाव शहर भागातील वीज वसुली करिता महावितरण उपलब्ध करून दिलेले वॅलेट याची जोड घेत. सुट्टीच्या दिवसातील ग्राहकांना थेट कार्यालयातच त्यांच्याकडील असलेले बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांमध्ये समाधान चे वातावरण आहे. एकीकडे दिवाळीची सुट्टी म्हटलं की कार्यालय ओस पडतात. पण याला कुठेतरी खामगाव येथील वीज वितरण कार्यालय अपवाद ठरत आहे. अत्यंत कुशल पद्धतीने सुट्टीच्या दिवसात वीज वसुलीचे नियोजन करत कार्यकारी अभियंता यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे .त्यामुळे लोकांकडे असलेले थकबाकी योग्य प्रकारे समाधानकारक पद्धतीने दिवाळी वसूल केल्या जाईल. महावितरण थकबाकीच्या मुळे अनेक वेळा ग्राहकांची वीज तोडणी देखील मोहीम राबवावी लागते. पण दिवाळी वीज तोड न करता वीज सुरळीत व ग्राहकांकडे असलेली थकबाकी देखील सुरळीत करण्याकरिता. या केलेल्या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यामुळे वीज वितरण कडचे काही प्रमाणात का होईना ग्राहकांकडे थकलेले वीज रक्कम महावितरण कडे येईल असे म्हटलं तर वावग ठरणार नाही. या उपक्रमाकरिता महावितरणचे संबंधित सर्व कर्मचारी अभियंते व वॅलेटचे माध्यमातून युनिव्हर्सल कॉम्प्युटर खामगाव जे मागील २६ वर्षापासून अविरत महावितरणच्या बिलिंग बाबतच्या उपक्रमात आपला विविध उपक्रमात सहभाग सेवा देत आहे. त्यांचे देखील खामगाव महावितरण ला मोलाचे योगदान या विशेष उपक्रमात लाभले.

Protected Content