बिगारी कामगाराला लोखंडी आसारीने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पद्मालय रेस्ट हाऊसजवळ बिगारी काम करणाऱ्या एका व्यक्तीला कारण नसताना एकाने लोखंडी आसारीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, नंदकिशोर उत्तम पाटील वय 50 रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्य असून बिगारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नंदकिशोर पाटील हे बिगारी काम करण्यासाठी ठेकेदारासह पद्मालय रेस्ट हाऊस येथे जमा झाले होते. दरम्यान पद्मालय रेस्ट हाऊसच्या गेट समोर बसलेले असताना पंकज नथू पवार यांच्या चहाच्या टपरीजवळ पप्पू नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ केली. त्यामुळे नांदकिशोर पाटील यांनी दुर्लक्ष करत तेथून निघून गेले. त्यानंतर पप्पू नावाच्या व्यक्तीने दुचाकीच्या पाठलाग करून काहीही कारण नसताना हातातील लोखंडी आसारीने मारहाण करून डोक्यावर दुखापत केली, तसेच जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान काही नागरिकांनी भांडण सोडवा सोडवा करत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नंदकिशोर उत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पप्पू (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Protected Content