सागर कोळी महाराष्ट्र युथ आयडॉल समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पडळसरे येथील सागर कोळी याला नुकतेच गुणीजन गौरव महापरिषदेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय आदर्श युवक युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार 2022, सन्मानचिन्ह, पदक, सन्मान, महावस्त्र, मानकरी बॅच आणि मनाचा फेटा देऊन मुंबईत गौरविण्यात आले.

सागरने या आदी देखील महाराष्ट्र राज्यस्तरीय कवि संमेलनात सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवले आहेत. सागर हा गेल्या ३ वर्षे पासून कोरोना काळात ठिकठिकाणी गावात पोस्टर लावून, आरोग्य सेतू ॲप का प्रचार-प्रसार व माक्स, सेनिटायजर वाटप व पथनाट्यच्या माध्यमातून लसीकरण करून घेणे अशा प्रकारे जनजागृती केली. व काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा हि तो घेत असतो. दर वर्षी त्यांच्या वाढदिवसाला प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करत असतो. तसेच वृक्षरोपण ही करत असतो. राष्ट्रीय सेवा योजनाचा स्वयंसेवक असताना २ वर्षे त्याने जळगाव विद्यापीठ मार्फत २०१९ मध्ये कोल्हापूर पुरग्रस्त भागात विद्यापीठ टिम मध्ये कोल्हापूर भागात गडहिंग्लज तालुक्यात ६ दिवस श्रमदान केले या वेळी पडलेल्या घरातील साफसफाई करण्यासह स्थानिक पुरग्रस्ना जिवनाश्यक व शालेय वस्तूंचे वाटपही विद्यापीठ टिम सोबत करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना मार्फत चाळीसगाव पुरगस्त भागात सप्टेंबर २०२१ मध्ये ही श्रमदान केले तसेच विद्यार्थी विकास विभाग तर्फे युवक महोत्सवात शहादा येथे २ वर्षे सहभाग घेऊन, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा सहभागी झाला. व धरणगांव तालुक्यातील वराड गावात आदिवासी पाड्यावर अक्षर ओळख कार्यक्रम घेतला व तिथे आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षा. व शिष्यवृत्ती आदिवासी योजना विषयी मार्गदर्शन केले.

अनेक शिबिरात नेतृत्व केले असे समाज उपयोगी कार्यक्रम तो घेत असतो समाजच काही तरी देणं लागतो फुल नहीं फुलांची पाकडी म्हणून सागर हा बौद्धिक, श्रमदान, व्यक्तिमत्व विकास असे अनेक उपक्रम शिबिरात सहभागी होऊन समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सागर ला आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य कडुन ही 2020 मध्ये आद्यकवी महर्षी वाल्मिकी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

हीच सागरच्या सामाजिक कार्याची/ कामाची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गौरवपदक, महावस्त्र,मानाचा फेटा बांधून सागर सुकदेव कोळी यांना मुंबई येथे सांस्कृतिक सभागृह, मुंबई शहर दि. 6 जून 2022,सोमवार रोजी गौरवण्यात आले. सागर हा असे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजात नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मिळालेल्या पुरस्काराचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी कौतूक  अभिनंदन होत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!