व्यापार

क्राईम व्यापार

ढाकामध्ये गोदामाला भीषण आग;६९ जणांचा होरपळून मृत्यू

ढाका (वृत्तसंस्था) बांगलादेशची राजधानी ढाकामधील एका रसायनाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ६९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गोदामाला लागलेली आग रहिवाशी इमारतींमध्ये पसरल्याने लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढाका येथील ज्या परिसरात आग लागली तेथे इमारती आणि हॉटेल्स आहेत. इमारतीतून बाहेर पडता न आल्याने अनेकांना मृत्यू झाला आहे तर अनेक जण भाजले आहेत. केमिकल्स, बॉडी स्प्रे आणि प्लास्टिकची काही दुकानं या परिसरात असल्याने ही आग वाढली. भीषण आगीमधून आतापर्यंत ६९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून इमारतींमध्ये केमिकल्सचा साठा असल्याने आग पसरली […]

जळगाव ट्रेंडींग व्यापार

जळगावात खाद्य क्रांती… झोमॅटोची एंट्री !

जळगाव प्रतिनिधी । अगदी आपल्या घरपोच हॉटेल्समधील खाद्यपदार्थ आणून देण्याची सेवा पुरवणार्‍या झोमॅटो कंपनीचे आजपासून जळगावात कार्यान्वयन सुरू झाले आहे. फुड इंडस्ट्रीत यामुळे नवीन अध्याय सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. झोमॅटो ही फुड डिलीव्हरीत अग्रेसर असणारी कंपनी आजपासून जळगावात कार्यरत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे १२० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ ग्राहकांना या सेवेच्या माध्यमातून आपल्या घरपोच मागविता येणार आहेत. झोमॅटोची स्वत:ची कोणतीही हॉटेल नसल्याची बाब येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र जळगावातील बहुतांश ख्यातप्राप्त हॉटेलमधील खाद्यपदार्थ हे संबंधीत कंपनी ग्राहकाला अगदी घरपोच पोहचवणार आहे. यासाठी युजरला याचे अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागणार आहे. हे अ‍ॅप आपण येथे […]

यावल व्यापार

यावल येथे शासकीय गोदामाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

यावल ( प्रतिनिधी) येथील गेल्या चार वर्षापासुन बंद पडलेले शासकीय धान्य गोदामाचे काम अखेर सुरू झाले असुन धान्य साठवणीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यावल तहसील अतंर्गत येणाऱ्या स्वस्त धान्य मालाच्या साठवणी करीता गोदाम भाडे म्हणून राज्य शासनाच्या महसुल विभागास गेल्या अनेक वर्षापासुन महीन्याला चाळीस हजार रुपये मोजावे लागत होते.   या विषयाला राज्य शासनाने गांभिर्याने घेतल्याने युद्धपातळीवर कामास मंजुरी मिळवुन कामास सुरूवात करण्यात आली आहे. काम प्रगतीपथावर असतांना धान्य गोदामाच्या कामास विजमंडळाचे हाई हॉल्टेज प्रवाह करणाऱ्या विद्युत तारांचा अडथळा निर्माण झाल्याने काम बंद पडले होते. सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या या कामाला आता विद्युत तारांचा प्रश्न सुटल्याने प्रत्यक्षात सुरुवात झाली […]

जळगाव व्यापार

आपला दिवाणखाना सुशोभित करणारे तैल चित्र उपलब्ध

जळगाव प्रतिनिधी । आपला दिवाणखाना सुशोभीत करण्यासाठी अतिशय दर्जेदार असे तैल चित्र विख्यात चित्रकार सचिन मुसळे यांनी विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. सचिन मुसळे हे जळगावातील ख्यातप्राप्त चित्रकार असून त्यांच्या कलाकृती देश-विदेशात वाखाणण्यात आल्या आहेत. त्यांनी ग्रामिण जिवन कुंचल्यात अलगत पकडलेले तैल रंगातील (ऑईल ऑन कॅनव्हास) चित्र रेखाटले आहे. ३६ बाय ४८ इंच साईज मधील हे आकर्षक चित्र विक्रीस उपलब्ध आहे. याला अतिशय चांगल्या फ्रेम मध्ये अंकित करण्यात आलेले आहे. या चित्राची किंमत भारतीय रुपयात ७१०००/- आहे. इच्छुकांनी संपर्कासाठी सचिन मुसळे दुरभाष : ९८९००४३२९० यावर संपर्क करावा.

व्यापार

अ‍ॅमवेची हर्बल टुथपेस्ट बाजारपेठेत दाखल

मुंबई प्रतिनिधी । अ‍ॅमवे इंडिया या ख्यातप्राप्त कंपनीने आता ग्लिस्टर या नावाने हर्बल टुथपेस्ट बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. ग्लिस्टर या टुथपेस्टच्या माध्यमातून अ‍ॅमवे कंपनीने हर्बल ओरल केअर बाजारपेठेमध्ये प्रवेश केला आहे. यात अनेक औषधी वनस्पती घटकांसोबतच उत्तम चव व आल्हाददायी रंगाचे मिश्रण आहे. ग्लिस्टर हर्बल्सच्या सादरीकरणाची घोषणा करत मवे इंडियाचे प्रमुख विपणन अधिकारी संदीप शाह म्हणाले, ग्लिस्टर हा जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. पाच दशकांहून अधिक काळापासून सर्वाधिक विक्री झालेल्या या ब्रॅण्डने जगभरातील लाखो ग्राहकांचा विश्‍वास जिंकला आहे आणि त्यांच्या नेहमीच्या ओरल हायजीन नित्यक्रमाचा भाग राहिला आहे. उच्च दर्जाची उत्पादने देण्याची आमची कटिबद्धता कायम राखत आणि दीर्घकालीन […]