‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला काळाच्या पडद्याआड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिग बुल म्हणून ख्यात असणारे गुंतवणूक गुरू राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे.

स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (वय ६२) यांचं आज मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाल्याने भांडवलबाजारासह व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळखले जात होते. अतिशय डोळसपणे गुंतवणूक करण्यासाठी ते ख्यात होते. यामुळे ते कोणते स्टॉक खरेदी करतात आणि कोणते विकतात याकडे सर्वांचे लक्ष असे.

राकेश झुनझुनवाला सीए होते. हंगामा मीडिया आणि ऍपटेकचे ते चेअरमन असून व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता. भारताचे वॉरन बफे म्हणून त्यांचा नेहमी गौरव केला जात असे.

Protected Content